रेशनकार्डावर कमी धान्य मिळते ?तात्काळ करा या नंबरवर तक्रार !
Adivasi Press
News/आदिवासी प्रेस न्यूज :- रेशनकार्ड हि एक अशी वस्तू आहे ज्याद्वारे
गरजूंना,गोरगरिबांना,गरीब कुटुंबाना स्वस्त धान्य मिळत असते.आमच्या आदिवासी प्रेस
न्यूज ने अनेक गावात,खेडे पाड्यात,आदिवासी भागात जाऊन रेशन विषयी नागरिकांना
थोडक्यात माहिती विचारण्यात आली.तर आदिवासी प्रेस न्यूज टीम च्या माहिती नुसार बऱ्याच
ठिकाणी रेशनकार्डवर कमी धान्य मिळत असल्याचे समोर आले आहे.तर सर्व नागरिकांनी
अन्याया विरुद्ध आवाज उठवा आणि रेशन कार्डवरती कमी धान्य मिळत आहे,तर याबाबत
तक्रार करू शकतात.शासनतर्फे याबाबत प्रत्येक राज्यात हेल्पलाईन नंबर जारी केले
आहे.
कोणत्याही रेशनकार्ड धारकाला आपल्या वाट्याचे धान्य कमी मिळत असेल तर शासनाच्या
टोलफ्री हेल्पलाईन/तक्रार नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.धान्य कमी मिळत असेल
तर महाराष्ट्र शासनाचे १८००२२४९५० या टोलफ्री हेल्पलाईन नंबर वर तक्रार नोंदवू
शकता किंवा www.mahafood.gov.in या
महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वरती तक्रार अर्ज करू शकता व यासह रेशन कार्डबाबत
अर्ज देखील करू शकता.
अधिक माहिती साठी
शासनाच्या www.mahafood.gov.in या
अधिकृत पोर्टल वरती माहिती पहा.