आदिवासी समाजावर होणारे अत्याचार कधी बंद होईल?

 

आदिवासी समाजावर होणारे अत्याचार कधी बंद होईल?


जय आदिवासी युवा शक्ती(जयस),साक्री,महाराष्ट्र :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावातील आदिवासी तडवी भिल समाजातील उसतोड मजूर बाहेर गावी उस तोडण्यासाठी गेले असताना यांच्यावर अन्याय अत्याचार होत असल्याची माहिती समोर आली आहे.या विषयावरून आज दिनांक ०९-१२-२०२१ रोजी,आदिवासी भिल समाजातील उसतोड मजुरांची व्यथा समजून त्यांना सुखरूप घरी आणणे बाबतीत व त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा तसेच संबधित प्रकरणात मुकादम व वाहनमालक दोषी आढळल्यास त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व कठोर कारवाई करण्यात यावी असे तक्रार निवेदन जय आदिवासी युवा शक्ती (जयस) संगठन ,साक्री तालुका मार्फत पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. यावेळी जयस तालुका कार्य.अध्यक्ष सुरेश माळचे,जयस तालुका अध्यश प्रमोद शिंदे,विनोद मोरे,महेंद्र महाले,कुंदन गांगुर्डे,अजय पवार,आदी उपस्थित होते.

Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post