१२वी पास शेतकरी पुत्र ! Manohar Bagul

 

१२वी पास शेतकरी पुत्र !

 


Adivasi  Press  News :-  सर्व  नागरिकांना,राजकीय क्षेत्रातील नेते महोयांना नमस्कार ! सर्व सैनिकांना शेतकरी पुत्राचा मानाचा सलाम !.मी मनोहर बागुल,आदिवासी भागातील एका खेडे गावातील आजचा १२ वी पास झालेला शेतकरी मुलगा. माझे शिक्षण शासकीय आदिवासी मुलाचे वसतिगृह,साक्री,ता.साक्री,जि.धुळे येथून १२ वी पूर्ण झाली.२०१९-२० या वर्षी १२ वी पूर्ण झाली आणि २०२० याच वर्षी मार्च महिन्यात कोविड-१९ म्हणजेच कोरोना भारतात आला.सर्व काही बंद झाले.दुकाने,शेती साठी लागणारे औषधांचे दुकाने,भाजीपाला मार्केट,शाळा,कॉलज सर्व बंद झाले.त्यावेळी शेतकऱ्यांचे शेतीतील भाजीपाला शितीतच सडून खराब झालं,आणि थोड फार भाजीपाला विक्री केले तेला पण चांगला भाव मिळाले नाही.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,शेतकरी कर्ज बाजारी झाले.शेतकऱ्याचे मुले आणि संपूर्ण  कुटुंब पोटापाण्यासाठी मजुरीला जाऊ लागेल. 2020 हा वर्ष पूर्ण लॉकडाऊन मध्येच गेला.म्हणजे शेतकऱ्याचे २०२० ह्या वर्षी शेतीतून उत्पन्न झालीच नाही.आणि ह्याच लॉकडाऊन मुळे कित्तेक विद्यार्थ्यांची शाळा सुटली,त्यातलाच मी एक आहे……

दोन वर्ष लॉकडाऊन होते,आणि ह्या दोन वर्षात शेतकऱ्याचे शेतीत काहीही उत्पन्न मिळालेले नाही.अशातच निसर्ग राजाने साथ दिली नाही,पाऊस वेळेवर झालं नाही. अशा वेळेला शेतकरी उपाशी झोपला. सागण्याचा उद्देश एकच आहे,शेतकऱ्याची इतकी हाल का ? मी जेव्हा पासून शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो,तेव्हापासून या शेतात खेळतोय,राहतोय,जगतोय.आणि शेतकऱ्याची मुले चौथी पासूनच शेतात आपल्या आई वडिलांना काम करू लागतात,किंवा कामे करतात.

सरकारी नोकरला सकाळी १० वाजता ऑफिस सुरू होत असते आणि संध्याकाळी ५ वाजता सुट्टी होत असते.कोणीही असो तो,सरकारी अधिकारी असो किंवा राजकारणी मंत्री,नेते असोत. मग प्रश्न एकच आहे की,शेतकऱ्याला रात्री चे १२ वाजता लाईट का दिली जाते? आठवड्यातून ३ दिवस दिवसा लाईट दिली जात असते,पण ते पण ८ तासा मधून फक्त एकच तास लाईट चांगली राहत असते,मोटर चांगली चालत असते.आणि बाकीचे दिवस रात्री चे १२ वाजता लाईट देत असतात.असे का? ….. सरकारी  नोकरी वाल्याचा जीव आहे,सरकारी नोकरी वाल्याला,अधिकाऱ्याला थंडी लागते,मग शेतकऱ्याचे जीव नाही आहे का?शेतकर्याला थंडी नाही वाजत का?.....हे शेतकरी मुलाचे राजकीय नेते,शासनाला प्रश्न आहे.असे का?...रात्रीच्या वेळे ला जीव जनावरांचे धोका असतो, पाया खाली केव्हा साप,विंचू येईल ते माहीत नसते,तरी सुद्धा पूर्ण रात्र भर जीवाची काळजी न करता,थंडी वाऱ्यात पिकाला पाणी  भरत असतो तो म्हणजे शेतकरी.आणि याच शेतकऱ्याला एवढे रात्रं आणि दिवस कष्ट करून पिकाला मनासारखे भाव मिळत नसते,,,,,,,,,,,,,तर शेतकरी मनासारखे जीवन जगेल कधी? वीज बिल भरणार नाही तर लाईट बंद केली जाते.पहिलेच या २ वर्षात शेतकऱ्याची शेतात उत्पन्न नाही आणि अशा वेळेस वीज बिल भरेल कुठून? आणि ह्या वेळी शेतकऱ्याने धान्य विकून,उसने पैसे घेऊन वीज बिल भरले..तर आता मंत्री, नेते कुठे आहेत?भाषणे तर खूप मोठी देत असतात.

राजकारणी नेते मतदानाच्या वेळेस शेतकऱ्यांना काही खोटी वचने देत असतात आणि मतदानाची भिक मांगत असतात.मतदानाच्या वेळेस नेते सांगतात की,लाईट २४ तास करू,कधी लाईट जाणार नाही,वीज बिल माफ करू. अशे भरपूर भाषणे ते देत असतात मग आता काय झोपले आहेत काय?...आता शेतकरी रात्री थंडी वाऱ्यात पाणी भरून भरून मरतोय.ते आता दिसत नाही का?

मीडिया,न्यूज यांना सुद्धा कांद्याला किंवा शेतकऱ्याच्या पिकाला थोडे भाव काय वाढते तर मीडिया,न्यूज वाल्यांना ब्रेकिंग न्यूज मिळत असते व हे सर्व ब्रेकिंग न्यूज बनत असते.मग शेतकरी रात्री थंडी वाऱ्यात कष्ट करून ते पीक पिकवत असतो ते का दिसत नाही? येथे त्यांची TRP वाढत नाही का? एकदा सिनेमा अभिनेत्याचा वाढदिवस असो किंवा त्यांनी सोशल मीडिया वरती जोक पण पोस्ट केली तरी त्या अभिनेत्याला टीव्ही वरती दिवस भर दाखवत असता.आणि इकडे शेतकरी रात्री थंडी वाऱ्यात पाणी भरून मरत आहे तर दुसरी कडे देशाचे जवान बॉर्डर वरती लढाई मध्ये शहीद होत आहेत ते का मीडिया,न्यूज वाले टीव्ही वरती दिवस भर दाखवत नाही?...

शासनाने तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कर्ज योजना सुरू केल्या आहेत.पण ते सुद्धा फक्त नावालाच.कारण त्या योजनांचे अर्ज भरून जेव्हा बँकेत जात असता तेव्हा बँक मधील साहेब लोक सांगत असतात की,ही योजना आमच्या बँकेत सुरू झालेली नाही.मग देशभरात कोणत्या ठिकाणी ह्या योजना सुरू आहेत तेच कळत नाही….. शेतकऱ्यांसाठी PM किसान कर्ज योजना सुरू करण्यात आली,आणि जेव्हा शेतकरी बँकेत जाऊन या योजने विषयी माहिती विचारत असतो तेव्हा पण तेच की,ही योजना आमच्या बँकेत नाही आहे…. मग ह्या सर्व योजना काय फक्त नावाला सुरू आहेत का?१२वी पास शेतकरी पुत्र !

काही चुकीचे लिहिले गेले असेल तर क्षमा असावी……

आपलाच

एक १२ वी पास शेतकरी पुत्र,

मनोहर बागुल,शेतकरी पुत्र

(Adivasi Press News )

_ Manohar Bagul,Adivasi press News


Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post