आम्ही संपूर्ण वीजबिल भरण्यास तयार आहोत परंतु …….
1)आम्हाला 8 तासच वीज द्या ,पन दिवसा द्या , परंतु 440 व्होल्ट (+-5%)
2) आम्हाला
मिटर रिडींग प्रमाणे वीजबिल आकारा (कारण पावसाळ्यात आमचे पम्प 4 महिने बंद असतात तरीही आम्हाला वीजबिल
तेव्हडेच असते HP प्रमाणे .
आणी उन्हाळ्यात आमच्या विहिरी
कोरड्या असतात तरीही वीजबिल तेव्हडेच असते )
3)आमच्या DP वरील ट्रान्सफॉर्मर ची ऑइल लेव्हल तुम्ही
करा कारण ट्रान्सफॉर्मर तुमचा आहे त्याचे मेंटेनन्स तुम्ही करायला हवे .
4) DP वरील फ्युज तुम्ही बदला कारण ती तुमची जवाबदारी आहे
5)आमच्या
पिकांवरून जाणाऱ्या तारी (कंडक्टर ) तुम्ही टाईट करा .
6)आणी
सगळ्यात महत्वाचे आमच्या पोल वरील मिटर पर्यन्त सुरळीत सप्लाय आणून देणे (3फेज/1फेज 440/215 व्होल्ट )आमच्या वेळे प्रमाणे देणे
हि जवाबदारी स्वीकारा
अर्थात ट्रान्सफॉर्मर शॉर्ट होवो ,फ्युज खराब होवोत ,किंवा कुठेही तार (कंडक्टर) तुटोत किंवा
खाली येवो कुठल्याही वीज ग्राहकांना वर्गणी काढून पैसे देण्याची वेळ येऊ देऊ नका .
जशी इंडस्ट्रियल किंवा एक्सप्रेस फिडर
घेणाऱ्या ग्राहकाला सुविधा असते .
या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय वीजबिल
भरणार नाही .
धन्यवाद,
आपलाच एक शेतकरी
तुम्हाला काय वाटते नक्की कॉमेंट्स द्वारे
कळवा.......