शेतकऱ्यांना वीज बिल भरावेच लागेल : अन्यथा वीज कनेक्शन तोडले जाईल .....
महाराष्ट्र :- वीज फुकटात तयार नाही. त्यासाठी कोळसा लागतो,पैसा
लागतो,कर्ज काढावे लागते,ते आणायचे कुठून? शेतकऱ्यांना सवलत दिली जाईल,मात्र वीज बिल माफ होणार नाही,वज बिल भरावेच लागेल.अशी कठोर भूमिका
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतली आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत काय सांगता बघा......
“शेतकऱ्यांना वीजबिल
भरावेच लागेल.फार तर त्यांना वीजबिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे.महावितरणावर
५६ हजार कोटींचा बोजा आहे,तो भरायचा कुठून? वीज फुकटात तयार होत नाही.कोळसा,पाणी
यापासून वीजनिर्मिती होते,त्याला पैसे मोजावे लागतात.वीज वापरतात मग वीज बिल
भरायला का नको वाटते? भाजपाने शेतकऱ्यांना सवय लावून ठेवली आहे,अडचण निर्माण केली
आहे.”
-नितीन
राऊत,ऊर्जामंत्री
जशास तसे उत्तर देणार.......
“महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसे उत्तर देऊ.
सदोष वीज बिल दुरुस्त करा,बिलांवरील दंड व्याज माफ करा.शेतकरी बिल भरण्यास तयार
आहे.शेतकरी काही फुकटा नाही."
- राजू
शेट्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना
अशातच शेतकऱ्यांची आत्महत्त्या.....
सध्याचे हिवाळी हंगाम सुरु झाले आहे.आणि सर्व शेतकरी बांधवांचे शेतात
गहू,हरबरा,उस,कांदे पिंकांचे लागवड सुरु झाली आहे,पेरणी सुरु झाली आहे.आणि अशातच
महावितरण कडून कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे.यामुळे शेतकरी आक्रम झाले
आहे.चार दिवसापूर्वी बीडमधील एका शेतकऱ्याने महावितरण कडून विज कनेक्शन
तोडल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
बऱ्याच भागात कृषीपंप फक्त चारच महिने वापरले जाते......
महाराष्ट्रातील बऱ्याच भागात शेतकऱ्यांच्या
विहिरीला चांगला पाणी नाहि,काही भागात फक्त पावसाळी शेती केली जाते, तर काही भागात फक्त
हिवाळी हंगामाची शेती केली जाते.
धुळे,साक्री,नंदुरबार व बऱ्याच भागात शेतकरी शेतात पावसाळी व हिवाळी
पिक करत असतात . परंतु पावसाळी पिकाला विहिरीतून पाणी देणे किंवा वीज पंपाने पाणी दिले
जात नाही,म्हणजे पूर्ण पावसाळा चार महिने विज पंप बंद असते,तरीही बिल मात्र वीज
पंपाच्या HP नुसार (3HP,5HP,7HP) सुरूच असते. तसेच हिवाळी पिक काढल्यानंतर
उन्हाळ्यात या भागात विहिरींना पाणी नसतो तेव्हा चार महिने वीज पंप बंदच असते,तरी सुद्धा
वीज बिल मात्र पंपाच्या HP नुसार (3HP,5HP,7HP) सुरूच असते.म्हणजे 12 महिन्यातून फक्त चार महिने
काही भागात काही शेतकऱ्यांचे वीज पंप वापरले जात असते तरी सुद्धा पूर्ण महिन्याचे
वीज बिल वसूल केले जाते,तेपण HP नुसार (3HP,5HP,7HP).शेतकऱ्यांचे ८ ते ९
महिन्याचे वीज बिल वीज पंप न वापरता
आकारले जात आहे.याच्यात शेतकऱ्याचे शेतीत उत्पन्न कमी आणि वीज बिल जास्त असे झाले
आहे.
एक अजून महत्वाचे म्हणजे विजेची मेन डीपी ची अवस्था एवढी खराब असते कि
त्या ठिकाणी कायम काहीना काहीना दुरुस्ती करावी लागत असते,जसे कि फ्युस,ओईल लेवल
इ.तर या सर्व दुरुस्तीचा खर्च सुद्धा शेतकरी कडून गोळा केले जात असते.म्हणजे वीज
बिल शेतकरी च भरेल,आणि डीपी ला जो काही खर्च येत असतो ते सुद्धा शेतकरीच देईल का?
शेतकरी पूर्ण वीज बिल भरेल.....
परंतु महावितरणने शेतकऱ्यांना ८
तासच वीज द्या पण दिवसा द्या, बिल भरले जाणार परंतु HP नुसार (3HP,5HP,7HP)
नाही,तर रीडिंग नुसार जेवढे वीज पंप वापरले जाणार तेवढेच वीज बिल घ्या. डीपी चे जे
काही दुरुस्ती खर्च असेल तो सर्व महावितरण करेल,कारण डीपी महावितरणाची आहे. एवढे
करा सगळे शेतकरी वीज बिल भरतील.
परत मागील दोन वर्षापासून देशात लोकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे
मोठे नुकसान झाले आहे,भाजीपाल्याला मनासारखा भाव नाहि,शेतीमध्ये वातावरण खराब
असल्यामुळे मागील दोन तीन वर्षापासून चांगली उत्पन्न नाही तर शेतकरी एवढे वीज बिल
देईल कुठून?
-
मनोहर बागुल,शेतकरी पुत्र (जयस संघटन)