मृत व्यक्तींना सुद्धा दिला कोरना लसीकर सग दुसरा डोस?| Corona Vaccination

 

मृत व्यक्तींना सुद्धा दिला  कोरना लसीकर सग दुसरा डोस?| Corona Vaccination



आज देशात जवळपास १०० कोटी नागरिकांना कोरोन लसीकरन चे पहिला व दुसरा डोस दिल्याचे किंवा लसीकरण केल्याचा दावा केला जात आहे. आणि अशातच कोरोन लसीकरण सुरु असताना लसीकरण बाबत एक मोठी बातमी उघडकीस आली.

धुळे:- शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे एक कोरोन लसीकरण बाबत बाबत विचित्र घटना घडली. ती म्हणजे एका सहा महिन्या पूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर वर दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१ रोजी करोना लसीकरणचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज प्राप्त झाला.आणि ज्या व्यक्तीच्या नावाने कोरोन लसीकरण चा दुसरा घेतला असे नोंदणी केली परंतु मुळात तो व्यक्ती सहा महिन्या अगोदर अल्पशा आजाराने निधन झाले. तरी सुद्धा लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्याचे मेसेज आले.

असे कळताच ते कुटुंबीयही अचंबित झाले, सर्वाना प्रश्न निर्माण झाले का,हे सर्व लसीकरणाची संख्या वाढविण्याचा  हा प्रकार तर नाही ना ? या घटनेचे सर्व गावात चर्चा झालेली आहे. सर्व जनतेला प्रश्न पडत आहे कि,हे सर्व काय आहे ?

येथील बन्सीलाल सुका धनराळे वय ६६ यांनी दिनांक १० मार्च २०२१ रोजी कोरोन लसीकरणाचे पहिले डोस घेतले होते. परंतु दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजी बन्सीलाल धनराळे यांचे दुखद निधन झाले.तरी सुद्धा कोरोनाचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईल वरती आला.त्यांचा मुलगा विनोद धनराळे यांनी त्या मेसेज वरून लसीकरन केल्याचे प्रमाणपत्र डाऊनलोड  केला,तर त्य प्रमाणपत्रावर त्या व्यक्तीच्या दोन्ही डोस घेतल्याचे नोंद व तारखा आहेत.दुसरा डोस त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतल्याचे प्रमाणपत्रावर नमूद आहे.

हे सर्व काय आहे ?

हे सर्व फक्त कागदावरच तर नाही ना ?

 

Manohar Bagul,

Adivasi Press News 

(The Tribal News & Information )



Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post