प्रधानमंत्री आवास योजना PM AWAS YOJANA | खऱ्या अर्थाने कशी सुरु आहे कळेल का ?

 

प्रधानमंत्री आवास योजना PM AWAS YOJANA | खऱ्या अर्थाने कशी सुरु आहे कळेल का ?



आदिवसे प्रेस न्यूज :- देशात २५ जून २०१५ रोजी पासून प्रधान मंत्री आवास योजना राबिण्यातयेत आहे.प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील बेघर किंवा कच्चे घर असलेल्या कुटुंबाना घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणे हे आहे.

या योजनेचे लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायती मार्फत केले गेले.

   मग अजूनही बरयाच गावात ,ग्रामीण भागात अत्यंत गरीब कुटुंबाला घरकू का मिळालेला नाहि?

ग्रामपंचायतिने या गरीब कुटुंबाचे सर्वे केले नाही का ? का ते कुटुंब दारिद्रे रेषेखाली नाहीत ?

असे खूप काही प्रश्न आहेत.

बर घरकुल मिळाला ग्रामीण भागात,

Ø  तर घरकुलाचे बांधकामचे एकून अर्थसहाय्य ९५ हजार येवठा  आहे.

Ø  हे घरकुल अर्थसहाय्य अनुदान व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांचे अकुशल मजुरीच्या स्वरुपात अर्थसहाय्य दिले जाते.

Ø  तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना स्वतंत्र अर्थसहाय्य निधी उपलब्ध केले जाते.

म्हणजे कमीत कमी या योजेने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी १ लाख २० हजार रुपये इतके अर्थसहाय्य लाभार्थ्याला मिळत असतात.





परंतु खऱ्या अर्थाने घरकुल लाभार्थ्याला एवढे अर्थसहाय्य मिळतच नसतो.

Ø  कारण ग्रामपंचायत सर्वे करत असते तेव्हाच त्या सर्वे करणाऱ्याला हजार – पाचशे रुपये द्यावे लागतात.

Ø  घरकुल मंजूर झाल्यावर लाभार्थ्यास परत त्या सर्वे करणारा किंवा अधिकाऱ्याला हजार-पाचशे द्यावे लागतात.

Ø  घराचा बांधकाम सुरु झाल्यावर,घराचा पाया बांधला कि परत त्या सर्वाना पैसे द्यावे लागतात.

आणि हो ज्या घरकुल लाभार्थ्याने या सर्वाना लाच दिली,पैसे दिले तरच सर्वे करणारा व्यवस्थित सर्वे करत असतो व घराचे काम पूर्ण होत असते,नाहीतर या सर्वाना लाच दिली नाही,पैसे दिले नाही तर एक घरकुल बांधकाम पूर्ण होण्यासाठी कमीत कमी २ ते ३ वर्ष लागत असतात.असे का ?

 

ज्या लाभार्थ्याला या योजने अंतर्गत घरकुल अर्थसहाय्य ची गरजच नाही तरी सुद्धा त्यांना या योजने अंतर्गत घरकुल मिळत असते,आणि ज्या कुटुंबाला खरी गरज आहे या योजने अंतर्गत घरकुल बांधकामाची त्यांना याचे लाभच नाही. असे का ?PM AWAS YOJANA 

    काही लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत लाभ मिळाले असून त्यांनी घरे बांधले नाहीत,तरी सुद्धा अशा लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळाले आले,घर न बांधता अर्थसहाय्य मिळवण्या करीता वरील सर्वाना हजार पाचशे दिले कि काम झाले.

हे सर्व कधी थांबणार ?

या विषयावर आपले काय मत आहे नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा.


 https://www.youtube.com/c/AdivasiPressNews

Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post