शालेय विद्यार्थांना शाळेत जाण्यासाठी एसटी बसची गैरसोय ? विद्यार्थांनी दिले निवेदन.
पिंपळनेर बस स्थानक नियंत्रकांना निवेदन देताना .
पिंपळनेर बस स्थानक नियंत्रकांना निवेदन देताना . |
पिंपळनेर :- पिंपळनेर परिसरातील सकाळ शिप शाळेतील विद्यार्थांना सकाळी एसटी
बस मोजक्या प्रमाणात असल्या कारणाने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने शाळेत जावे
लागत असते व शाळेत वेळेवर पोहचत नसतात तसेच विद्यार्थानाची शाळेत गैरहजेरी होत
असते. धोंगडे दिगर,पारगाव,धामंदर,विरखेल,कोकणगाव,शेवगे या परिसरात सकाळी वेळेवर
एसटी बस उपलब्ध नाहीत तसेच मोजक्या एसटी बस आहेत त्यामुळे बस मध्ये विद्यार्थांना
जागा नसते.
आज महाराष्ट्र
राज्य परिवहन महामंडळचे पिंपळनेर बस स्थानाकन व्यवस्थापकाला पिंपळनेर बस स्थानक ते
धोंगडे दिगर सकाळी ७.०० वाजता बस येण्याची मागणी निवेदानामार्फात करण्यात आली.
निवेदन देते वेळी, सर्व विद्यार्थी तसेच प्रमोदभाऊ शिंदे,अध्यक्ष,जय आदिवासी युवा
शक्ती (जयस) संघटन,मनोहर बागुल,प्रेस,मिडिया प्रमुख,कुंदनभाऊ गांगुर्डे,पिंपळनेर
शहराध्यक्ष, जय आदिवासी युवा शक्ती (जयस) संघटन,अजय
पवार,कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रवादी कांग्रेस विद्यार्थी सेना,जय रावण
प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य प्रमुख विकास
भाऊ अहिरे ,निलेश भाऊ अहिरे ,आदिवासी जनता फौंडेशन,धुळे महाराष्ट्र राज्य,जय
आदिवासी युवा शक्ती,साक्री महाराष्ट्र राज्य व मोठ्या संखेने शालेय विद्यार्थी
उपस्थित होते. तसेच तत्काळ बस सेवा सुरु करण्यात येईल असे आव्हान पिंपळनेर बस
स्थानक नियंत्रक यांनी दिले.
आदिवासी प्रेस न्यूज
18/07/2023
Manohar Bagul