हिंदू दैवतांची पूजा करणे आदिवासी बांधवाना पडेल महागात....
आदिवासी समाजाचे कुलदैवत कोणते ?
आदिवासी कला,संस्कृती,परंपरा जपली नाही तर आदिवासी अस्तित्व होवू शकते नष्ट!
आदिवासी समाज हा निसर्गाची पूजा करतो. निसर्ग पूजा,डोंगऱ्या देव ,घट्या देव,वाघ देव,नाग देव,चंद्र -सूर्य देव,कंसरा माता असे निसर्गात बसलेले दैवत म्हणजे आदिवासींचे कुलदैवत.आदिवासी समाजाची कला,संस्कृती,परंपरा ह्या सर्व गोष्टीवर आधारित आदिवासी समाजाचा अस्तित्व टिकून आहे.आदिवासींची कला,संस्कृती,परंपरा,दैवत म्हणजे आदिवासी होण्याचा अस्तित्व होय.
परंतु आजच्या युगात आदिवासी समाज हा हिंदू दैवतांची पूजा करताना दिसून येताय. याचा परिणाम शाळा,कॉलेज शिकत असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्रे मध्ये दिसून येतोय.जातीचा दाखला,जात वैधता प्रमाणपत्र काढत असताना अनुसूचित जाती -जमाती समिती पडताळणी करते तेव्हा आदिवासी समाज हा हिंदू दैवतांची पूजा करतो तर ते आदिवासी नाहीत असे ठराव देत असतात व ते प्रमाणपत्र अवैध ठरवत असतात. असे अनेक अडथळे येत असतात.
यामुळे आदिवासी बांधवांनी हिंदू दैवतांचे पूजा करण्याऐवजी आदिवासी दैवतांची पूजा केली पाहिजे,आदिवासी कला, संकृती,परंपरा जपली पाहिजे.अन्यथा पुढे आदिवासी समाजाचा अस्तित्व मिटेल.या विषयावर कोर्टाने सुद्धा आदेश काढला आहे, कि आदिवासी समाजाचा हिंदू दैवतांशी व चालीरीतीशी कुढल्याही प्रकाचा संबध नाही.तरी आदिवासी बांधवांनी हे सर्व बाबी लक्षात घ्यायच्या आहेत व आदिवसी कला,संस्कृती,परंपरा खूप जपायचे आहे.अन्यथा खूपच महागात पडू शकते.
मनोहर बागुल,
Tags:
आजच्या बातम्या