शेतकरी मित्रानो,आपण पिक नोंदणी केली आहे का?|पहा आपल्या गावातील यादी| E-Pik Pahani | Mahagov.in

 

शेतकरी मित्रानो,आपण पिक नोंदणी केली आहे का?|पहा आपल्या गावातील यादी| E-Pik   Pahani | Mahagov.in

 

मागील दोन ते तीन महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या इ पिक पाहणी शेतकऱ्यासाठी उपयुक्त असा चर्चेचा भाग ठरला आहे. याचे मोठे कारण म्हणजे या पूर्वी शेतकऱ्याच्या शेतात शेतीचे पिक पाहणी करण्यासाठी संबधित कार्यालयाशी संपर्क साधावे लागत असे,मग या त्यानंतर तलाठी भाऊसो किंवा कोतवाल प्रत्यक्ष पिक पाहणी करण्यासाठी येत असत. मग नंतर काही दिवसांनी पिक पाणी शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर येत असे.

विशेष म्हणजे काही ठिकाणी तलाठी किवा कोतवाल शेतकराच्या शेतात प्रत्यक्षात पिक पाहणी करण्यासाठी येतच नसायचे ! ते एका ठिकाणी बसून अंदाजे शेतकऱ्यांचे पिक पाहणी करत असत व शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर नोंदवत असत. याच्याने नुकसान हे फक्त शेतकऱ्याचे होत असायचे. कारण जे काही शेतकऱ्यांचे शेतात नुकसान होत असायचे ते सर्व अंदाजे सातबाऱ्यावर नोंदवत असत.मग ज्या काही शासनाच्या योजना असायचा त्याचा लाभ शेतकऱ्यांना पुरेपूर मिळत नसायचा.

 


पिक पाहणी Online मोबाईल वर झाल्याचे फायदे :-

पिक पाहणी हे Online मोबाईल  वर झाल्यामुळे शेतकरी आपले शेतातील पिक पाहणी स्वतः आपल्या शेतातून नोंदवू शकेल व आपल्या सातबाऱ्यावर पिक पाणी ची नोंद करू शकेल. तसेच शेतकऱ्याला आता संबधित कार्यालयाशी किंवा कोतवाल यांच्याशी संपर्क साधावे लागणार नाही.

 

पिक पाहणी आपल्या गावात किती शेतकऱ्यांनी केली कसे पाहाल ?

आपल्या गावातील किती शेतकऱ्यांनी इ पिक पाहणी द्वारे पिक नोंदणी केली आहे हे पहायासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

https://epeek.mahabhumi.gov.in/

Ø  > यानंतर आपल्या समोर View Summary Report  हा पर्यायवरती क्लिक करा.

Ø  > यानंतर आपला  DIVISION/DISTRICT/TALUKA निवडायचा आहे.

Ø  > तसेच आपले गावाचे नाव निवडा .

Ø  > मग आपल्या गावात किती शेतार्यानी इ पिक पाहणी द्वारे पिक नोंदणी केले आहेत व किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही ते सर्व पाहायला मिळेल.


Adivasi Press News 

(The Tribal News & Information )


विनम्र सूचना :- आदिवासी प्रेस न्यूज (Adivasi Press News ) चे मुख्य हेतू म्हणजे आपल्या आदिवासी भागातील कोणत्याही आदिवासी बांधवावर,शेतकरी बधावावर अन्याय होत असेल अथवा कोत्याही गावात अन्याय होत होत असेल तर त्या अन्याय विरुद्ध आवाज उठवून आपले हक्काचे मिळवणे गरजेचे आहे. तरी माझ्या सर्व आदिवासी बांधवाना नम्र विनंती आहे कि, आपल्या गावात तसेच परिसरात कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर व आपल्या आदिवासी संस्क्कृती,परंपरा,कला यांच्या विषयी माहिती नक्कीच आदिवासी प्रेस न्यूज ला पाठवा. संपर्क :- मो.८३९०३४७४०२ , whatsapp;- ८३०९३४७४०२ , email:- paltansarkarstudio@gmail.com [ ADIVASI PRESS NEWS (THE TRIBAL NEWS & INFORMATION) ]


Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post