मुंबईत परप्रांतीयांची आदिवासी भाजी विक्रेत्या महिलांना धक्काबुक्की

 

मुंबईत परप्रांतीयांची आदिवासी भाजी विक्रेत्या महिलांना धक्काबुक्की

मुंबई,महाराष्ट्र :- मुंबईत दिवसेंदिवस परप्रांतीयांची दादागिरी वाढताना दिसून येत आहे.मुंबई मध्ये कांदिवली भागामध्ये आदिवासी समाजातील भाजी विक्री करणाऱ्या महिलाच भाजीपाला फेकून त्यना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केले गेले. या घटनेचा व्हिडेओ social media व्हायरल झाल्यानंतर समता नगर येथील पोलिसांनी धक्काबुक्की व दादागिरी,शिवीगाळ करणारे आरोपी प्रशांत अमित सिंग,विक्रांत अमित सिंग या दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

अखेर आदिवासी वर अन्याय का ?




अशा सर्व परप्रांतीयांना ,दादागिरी करणार्यांना धडा शिकवला पाहिजे.

संबधित परप्रांतीयांवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी हक्क संवर्धन समिती,मुंबई यांनी केली आहे.कांदिवली पूर्वेकडील समता नगर येथील वेस्ट बस डेपो जवळच्या पदपथकावर गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी महिला भाजी पाल्याची विक्री करतात.

शनिवार दि.२३ रोजी येथे विक्रांत सिंग , अमित सिंग या तरुणांनी धुदघूस घातला.भाजीपाला फेकुन महिलांना धक्काबुक्की,शिविगाळ करण्यात आली. काही भाजीपाला गाडीमध्ये भरून नेण्यात आला.

आरोपींवर कुठलीही कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा !

आरोपींवर कुठलीही कारवाई न झाल्याने पोलीस ठाण्यावर मोर्च्या काढण्यचा इशारा आदिवासी संघटना,संस्थाकडून देण्यात आला आहे.

 

वेळ गेलेली नाही जागरूक व्हा आदिवासी भांधवानो ........

आता अन्याय सहन केले जाणार नाही ! न्याय आपला हक्काचा........


Adivasi Press News 

(The Tribal News & Information )


विनम्र सूचना :- आदिवासी प्रेस न्यूज (Adivasi Press News ) चे मुख्य हेतू म्हणजे आपल्या आदिवासी भागातील कोणत्याही आदिवासी बांधवावर,शेतकरी बधावावर अन्याय होत असेल अथवा कोत्याही गावात अन्याय होत होत असेल तर त्या अन्याय विरुद्ध आवाज उठवून आपले हक्काचे मिळवणे गरजेचे आहे. तरी माझ्या सर्व आदिवासी बांधवाना नम्र विनंती आहे कि, आपल्या गावात तसेच परिसरात कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर व आपल्या आदिवासी संस्क्कृती,परंपरा,कला यांच्या विषयी माहिती नक्कीच आदिवासी प्रेस न्यूज ला पाठवा. संपर्क :- मो.८३९०३४७४०२ , whatsapp;- ८३०९३४७४०२ , email:- paltansarkarstudio@gmail.com [ ADIVASI PRESS NEWS (THE TRIBAL NEWS & INFORMATION) ]



Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post